Sunday, October 25, 2015

बडबड गीते - 1

लाल लाल किटली
तिची भली मोठी पोटली
कुशीवर वळली अन्
घरंगळत सुटली

लाल लाल किटली
जाड्या कपावर रुसली
लांब जाऊन बसला
म्हणून स्वतःच फुगून बसली

लाल लाल किटली
सुकड्या कपाला चिकटली
कानाला कान लागला
म्हणून खुदकन हसली

लाल लाल किटली
धक्का लागून फुटली
गरम चहा कवेत घेण्याची
हौस नाही फिटली

No comments:

Post a Comment