Saturday, June 7, 2014

भावनेचे दगड

"जी माणसं भावनाप्रधान असतात, त्यांच्या स्वाभिमानाला जर जबरदस्त धक्का लागला तर दोनापैकी एक काहीतरी होतं. काही माणसं गप्प बसतात, मनातल्या मनात कुढतात आणि निवृत्तीचा मार्ग पत्करून सगळं आयुष्य एखाद्या बाभळीच्या झाडासारखं शुष्क घालवतात. ह्याउलट काही माणसं चिडून उठतात. सारासार विचार गुंडाळून ठेवतात आणि मग सगळ्यांवर वार करीत सुटतात. अशी माणसं एकेकाळी भावनाप्रधान होती हे सांगूनही खरं वाटत नाही " - वपु.

विचार आणि भावना या दोन गुणांमुळे इतर जीवांपेक्षा माणसाचं स्वतःचं वेगळेपण सिद्ध होतं. आणि म्हणूनच सजीवांमध्ये हुशार असा हा जीव. याबाबत तरी निदान वाद नसावा. पण मुद्दा असा आहे की माणसाच्या या ज्या काही भावना आहेत त्या नेमक्या कुठल्या गोष्टींमुळे दुखावल्या जातात? आणि त्यामुळे मग तो पशुसारखा का वागतो? वपुंनी जे काही म्हटलंय ते १०० टक्के खरं आहे. पण ते लिहिताना त्यांनी एक शब्दसंच वापरला आहे. तो म्हणजे "स्वाभिमानाला जबरदस्त धक्का." (वपुंचं वाक्यच का प्रमाण मानायचं वगैरे फालतू प्रश्न विचारू नयेत.)

आम्हाला शेकडो गोष्टींचे अभिमान आणि स्वाभिमान वगैरे आहेत. डझनभर दैवतं आमची. काही कधीच न अवतरलेली, तर काही गर्दीमुळेच अवतरलेली. त्यात लाडकी दैवतं, साहेबी दैवतं, राजेशाही दैवतं वगैरे वगैरे पोट-दैवतं. त्यांनी काही कर्तृत्वं गाजवलीही असतील. त्यांच्या त्या कर्तृत्वाबद्दल माहिती मिळवणं, त्यावर विचारविनिमय करणं, ते आत्मसात करणं वगैरे फंदात आम्ही पडत नाही. त्यांनी काहीतरी ज्याम भारी केलं ना म्हणजे ते थोर, बास! त्यांना जरा काही कुठे झालं की आमचं मानसिक संतुलन बिघडतं. रक्तच उसळतं आमचं. टकुरंच फिरतं. मेंदू, मन वगैरे सोडून दगड-धोंडे-तलवारी जवळ करतो आम्ही. ह्याला कापा, त्याला फोडा, अमक्याला पेटवा, तमक्याचा मुडदा पाडा. हे रक्ताचे पाट. च्यायला, भावनेशी खेळायचं नाही हां! भावना दुखावल्या की आम्ही काय वाट्टेल ते करतो.  कुणाचंच ऐकत नाही आम्ही. हां!

एवढ्या नाजूक आहेत हो का आमच्या भावना? की कोणीपण येतो आणि आमच्या दैवताला चार शिव्या घालतो, मणभर शेण फासतो, फोटो वेडावाकडा करतो आणि आम्ही लगेच पेटून उठतो. इतक्या कमजोर मनाचे आहोत आपण? काही बोलायचा अवकाश की दुखावली भावना. अरे? शाळेत मास्तर तमाम पोरांसमोर नाही नाही ते बोलून अपमान करायचे तेव्हा पण भावना दुखायच्या की. तेव्हा मारला होता का दगड?
आम्हाला बोललं तरी चालेल पण आमच्या महान दैवतांना काही बोलायचं नाही.
मान्य. महान आहेत ना ती? मग कुणीही चंटरपंटर बडबडलं तर त्याने काय घंट्याचा फरक पडणार त्या दैवताला? स्वतःचं रक्त उसळवून घेऊन काय फायदा? उगीचच हां काय!
काय तर म्हणे मुसलमान आम्हा हिंदूंना असं म्हणाला. नाही तर तो हिंदू आम्हा मुसलमानांबद्दल असं बरळला. झालं. चढाचढी सुरू तिच्यामायला! घाला ते चुलीत दोन्ही धर्म आणि बसा बोंबलत. दैवतं म्हणे. भावना दुखावल्या ह्यांच्या. घालून घ्या त्या भावना.

साधा प्रश्न आहे हो. एक फोटो पाहून भावना दुखावल्या जातात पण समोर घडणारा बलात्कार पाहून मात्र काही झाट होत नाही आमच्या भावनेला? काय म्हणायचं ह्याला? एका जीवंत जिवाच्या अब्रूचे निघणारे धिंडवडे पाहताना भावना कुठे जाऊन बसतात? नजरेसमोर कपडे फाडले जात असताना एक डोळे सोडून सगळं काही बंद होतं का? तेव्हा नाही का सापडत दगड, तलवारी, चाकू वगैरे? अजबच प्रकार म्हणायचा की हा. साला एक कोणतरी बडबड करणार आणि आम्ही माथी फिरवून घेणार. पण इथे डोळ्यासमोर चाललेला प्रकार आमच्या मेंदूला जरा सुद्धा धक्का लावणार नाही. तेव्हा दैवतं आठवणार नाहीत. धर्म तेव्हा सुचणार नाही. अहंकार तेव्हा उफाळून येणार नाही. काय कामाची मग ती दैवतं, ते धर्म? कशाला मानायचं त्यांना? आणि का साजरे करायचे ते उत्सव आणि जयंत्या? पेटवून द्या.

वपुंनी जे काही वर लिहिलंय ते वाचा, पुन्हा पुन्हा वाचा. खूपवेळ विचार करा त्यावर (जमत असेल तर. नाहीतर आपले दगड आहेतच रस्त्यावर पडलेले) भावना काय असतात, त्या कशाशी खातात, त्या दुखावल्या जाणं म्हणजे काय, त्या तशी दुखावल्या गेल्या की काय करावं वगैरे बेसिक गोष्टी समजून घ्या. आणि मग ठरवा दगड मोठा करायचा की भावना.

Tuesday, May 13, 2014

मराठीचा फालतू बाणा

आपल्याला ज्ञात असणा-या कुठल्याही भाषेचा अभिमान असावा. त्यातही मातृभाषेचा तर असावाच. ज्यांना नसेल तो त्यांच्या बौद्धिक कुवतीचा प्रश्न आहे. दर पन्नास कोसांवर भाषा बदलणा-या या देशात तर प्रत्येकाला आपापल्या भाषेचा अभिमान असणं साहजिकच आहे. पण इथे ज्या काही प्रश्नांमुळे डोक्यात काहूर माजलंय, त्यांची उत्तरं मिळण्याचं नावंच नाही. उलटपक्षी चिडचिडच अधिक. नक्की अभिमान कशाचा? आणि का? 
संतमहात्म्यांनी मराठी भाषा जन्माला घातली. मोठ्या कष्टाने नवीन शब्दं वगैरे बनवले. लय मेहनत घेतली बापड्यांनी. पण आज त्या भाषेचा जो काही बट्ट्याबोळ आजूबाजूला पहायला मिळतो ते बघून ज्ञानेश्वरांचा रेडाही म्हणेल की "बाबांनो मी फक्त हंबरतो वाटल्यास, पण तुम्हा नीट बोला." या लोकांचे उच्चार ऐकून ज्ञानोबांनी "चालवली भिंतही कोसळेल." स्वतः सारे संत त्यांच्या साहित्याची होळी करतील. आपण कुठे चुकत आहोत याची जराही जाणीव या महाभागांना नसावी. उलट हेच उच्चार स्पष्ट आणि उत्तम आहेत हीच ह्यांची धारणा. आपण मोठ्ठे!
कानाचे पडदे वाजवणारी कुठली चूक असेल तर ती म्हणजे ण आणि न यांची सरमिसळ. "ण आणि न ही दोन अक्षरं नसून एकच अक्षर आहे. त्यांचे उच्चार आपापल्या जिभेच्या कुवतीनुसार करायचे आणि ती कुठल्याही शब्दात कशीही कुठेही घुसवायची. वाक्य अर्थपूर्णच होतं" - हे समज नसांनसांत घेऊनच यांचं रक्ताभिसरण होत असावं.  मराठी भाषेलाही पश्चात्ताप होत असावा की ही दोन अक्षरं मुळात या भूतलावर आणलीच का. जगात कुठल्याही सजीव अथवा निर्जीव वस्तूचा इतका अपमान झाला नसेल जितका या दोन अक्षरांचा झालाय. कुठे घोडं अडतं काही कळत नाही. "लहानपणापासून असंच शिकत आलोय" हे वर सोयीस्कररित्या सांगायचं. "अरे गद्ध्यांनो, वाचनात कधीतरी आली असतील ना ही दोन्ही अक्षरं? तेव्हा काय बुद्धी शेण खायला गेली होती का? आणि हे प्रकरण आता एवढं फोफावलंय की न्यूज चॅनेल्सवर सरसकट हीच भाषा वापरली जाते. ती शुद्ध करायचे कष्टही कोणी घेत नाही. कारण ज्यांच्याकडे ती शुद्ध करायचे अधिकार आहेत त्यांच्या जिभेलाच भोकं आहेत. ही मंडळी ही अशी भाषा घेऊन समाज वगैरे सुधारायच्या गोष्टी करतात.
दुःख या गोष्टीचं आहे की उच्चारातली ही चूक सुधारायला गेलं की भाषेला लागलीच जातीचं आवरण येतं. "ही तुमची ब्राह्मणी भाषा आहे. तुम्ही सांगाल ते सगळंच बरोबर आहे असं मानायचे दिवस गेले आता." अरे??? हा काय चावटपणा आहे? ण आणि न यांचे उच्चार भिन्न आहेत आणि ते तसेच असतात, ह्यामध्ये जात कुठून आली? सजीव गोष्टी भेटतात, निर्जीव गोष्टी सापडतात, मिळतात या सुधारणेत ब्राह्मणी आव कुठून आला? पण ह्या जातीवाचक उद्गारांवरून कळतं की जिभेबरोबर मेंदूलाही भोकं पडलेली आहेत. "अरे, मूर्खांनो खूपच साध्या चुका आहेत ह्या. कुठेही जात काय आणता?
जी गत भाषेची तीच, किंबहुना त्याहीपेक्षा जरा जास्तच, मराठी सणांची. एक गणपती सोडला तर बाकीच्या सगळ्या सणांना अश्लील, लांच्छनास्पद, घृणास्पद बनवून टाकण्याचं श्रेय मराठीचा फालतू बाणा बाळगणा-यांनाच जातं. होळी आली की चिंब भिजलेली मुलगी, पिचकारी, धुळवड वगैरे शब्दांनी बरबटलेले मेसेजेस आणि फोटो आले. नागपंचमीलाही तेच. दहीहंडीच्या हंडी आणि दह्याचंही फार काही वेगळं नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी उभारणा-या गुढ्यांचाही वेगळा अर्थ. दिवाळीची रॉकेटं, अंगणातल्या रांगोळ्या, मकरसंक्रांतीचे तीळगूळ, नवरात्र, दसरा कशाचीच सुटका नाही यातून. या सगळ्या अश्लीलतेने सजूनच सण साजरे करायचे आणि म्हणायचं जय महाराष्ट्र. जिभेला खड्डे पडलेले, मेंदूला भोकं पडलेली आणि मन म्हणजे तर टराटरा फाडलेलंच म्हटलं पाहिजे.
हे असं असेल तर कसला अभिमान बाळगायचा. आणि का बाळगायचा. काय घंट्याची मराठीची बोलू कवतिके. आणि म्हणे मराठी भाषेचं संवर्धन केलं पाहिजे. बोडक्याचं संवर्धन. ण आणि न वाचवा आधी. मग बाकीचे स्वर आणि व्यंजनं आहेत. ते सगळं जगलं-वाचलं तर बघू भाषेचं जमतंय का ते. मोठा मराठीचा झेंडा फडकवतायंत स्वागतयात्रेत. त्या झेंड्याच्या कपड्याने मन आणि मेंदू स्वच्छ पुसून घ्या आधी. त्या दांड्याने जिभेला वळण आणा, पडलेले खड्डे बुजवा आणि मग नाचवा झेंडा. आणि हे जमत नसेल तर नका बाळगू मराठीचा बाणा, अभिमान. काय तर म्हणे गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा.चल, फूट इथून.  

Tuesday, March 4, 2014

रांड

रांड - क्या औकात है रे तेरी?
ठोकनेवाला - साली, मेरे तुकडोंपर पलनेवाली, मॅनेजर हूं मैं|
रांड - तो क्या उखाडा?
ठोकनेवाला - तेरे जैसा धंदा नही है मेरा, हरामी|
रांड - साले, तू भी तो खुद को बेच रहा है|
ठोकनेवाला - सठिया गयी है क्या? चोरीछुपे धंदा नही करता हूं मैं|
रांड -  पर मेरे पास तो मूंह छुपाकर ही आता है ना च्युतिए| घर पे बताकर आने की हिमत है क्या तेरे पिछवाडे में?
ठोकनेवाला - मादरचोद, मुझे अकल सिखा रही है!
रांड - अबे भडवे, वह भी तो नही है तेरे पास|
ठोकनेवाला - तेरे पास है तो कोठे पे क्यों आई?
रांड - मेरे बदन का पल्ला अकलसे भारी है| इसलिए मैं वह बेच रही हूं|
ठोकनेवाला - और मेरा अकल का पल्ला भारी है|
रांड - लगता तो नही है| लेकिन अगर है, तो तू भी एक रांड है| फर्क सिर्फ इतना है, की मैं बदन बेचती हूं और तू अकल| तेरा धंदा सफेद और मेरा धंदा काला| वाह रे दुनिया!