Saturday, January 7, 2012

रात्र नेटकी

(शुक्रवार ६ जानेवारी रोजी मुंबई टाइम्समध्ये छापून आलेला हा लेख)


रात्रीच्या वेळी रस्त्यावरचे ट्रॅफिक सिग्नल्स बघितलेत का कधी?

ड्रायव्हरने सावधगिरीने, काळजीपूर्वक गाडी चालवावी म्हणून पिवळे सिग्नल ब्लिंक करत असतात. पण अगदी त्याच रात्री, अगदी तशाच वेळी एका वेगळ्याच विश्वातले 'सिग्नल्स' मात्र हिरवे असतात. आणि तिथल्या रहदारीचा वेगही भरधाव असतो. हे विश्व म्हणजे 'र्व्हच्युअल लाइफ' अर्थात 'ऑनलाइन जग.' मोठ्या शहरांमधल्या नाइट लाइफच्या कथा तशा सर्वांना माहित्येत. पण एका चौकोनी खिडकीसारख्या डेस्कटॉपच्या पल्याड रंगणाऱ्या 'लेटनाइट नेटलाइफ'वर मात्र छोट्यामोठ्या शहरातले सगळेचजण फिदा आहेत. हे 'निशाचर' या नेटलाइफमध्ये मुक्तसंचार करत असतात, 'उडने को खुला आसमान' मिळाल्यासारखा!

या निशाचरांचं उजाडतंच ते मुळी इतरांचं मावळल्यावर. म्हणजे जेवणखाण आटोपलं, अंथरूण-पांघरूणांचा सडा घरातल्या इतर खोल्यांमध्ये पडला, की यांची बोटं की-बोर्डवर थिरकू लागतात. कम्प्युटर-लॅपटॉपचं पॉवर बटण दाबलं, की यांच्यातली ऊर्जा जागृत होते, पुढची अख्खी रात्र जागवायला. इण्टरनेटवर स्वार होत ते या नेटविश्वाची सफर घडवायला सज्ज होतात. बसण्याच्या जागेसाठी 'सेटिंग-फिल्डिंग'ही लावली जाते, कारण प्रत्येक निशाचराची स्वतंत्र टेरेटरी म्हणजेच स्वत:ची खोली असेल असं नाही ना. म्हणूनच मग सोयीनुसार (स्वत:चीही आणि घरातल्या इतरांचीही) जागा निवडली जाते. कसंय, डेस्कॉपच्या प्रकाशात कीबोर्ड जरी दिसत असला तरी तोच प्रकाश झोपलेल्यांच्या चेहऱ्यावर पडून रंगाचा बेरंग होण्याची शक्यता असते. त्यामुळे लॅपटॉप-डेस्कटॉपचं तोंड आणि झोपलेल्यांचा चेहरा यांच्या '३६चा आकडा' जमवून आणणं मस्ट असतं.

या दुनियेत वावरणाऱ्या लोकांचा एक खास पेहरावही असतो बरं का! डोक्यावर हेडफोन्स, लॅपटॉप-कम्प्युटरला एक एक्स्टर्नल हार्डडिस्क जोडलेली, उरलेल्या खाचा पेनड्राइव्हने भरलेल्या, एक हात माऊसवर आणि दुसरा की-बोर्डवर (हे म्हणजे एक हात स्टिअरिंग व्हीलवर आणि दुसरा गिअरवरसारखंच), अशा सगळ्या अवतारात सोफा-जमीन-बेड-टेबलखुचीर्सारख्या कुठल्याही आसनावर हे निशाचर नांदत असतात.

डेस्कटॉपवर किमान सहा ते सात विण्डोज उघडलेल्या. एकीकडे म्युझिक डाउनलोडिंग सुरू असताना दुसरीकडे अमेरिकेतल्या मित्राबरोबर ऑस्ट्रेलियातल्या मैत्रिणीविषयीच्या गप्पा रंगलेल्या. कुठलेतरी भन्नाट व्हिडिओज 'बफर' किंवा लोड होत असताना मध्येच असाइनमेण्टच्या वर्ड डॉक्युमेण्टमध्ये ५० शब्दांची भर पडलेली. दूरदेशीच्या युगुलांसाठीही भेटण्याची हक्काची जागा आणि हमखास शांततेची वेळही हीच ठरलेली. वेबकॅम-हेडफोन्सवगैरेच्या साथीने यांच्या 'प्यारभऱ्या' गप्पा रंगलेल्या. कुणाचाही व्यत्यय नसल्याने ही रंगत एवढी वाढत जाते की र्व्हच्युअल विश्वाला वास्तवाचाच स्पर्श झालेला. रात्रीच्या त्या नीरव शांततेचा फक्त आणि फक्त की-बोर्डवर बोटं आपटून होणाऱ्या आवाजानेच काय तो भंग होणार.

मग जशी रात्र चढत जाते तशी यांच्या विण्डोजची संख्याही वाढत जाते. प्रत्येक विण्डो म्हणजे रस्त्यावरचा एखादा स्टॉल, पब अशी कल्पना केली, की या 'लेटनाइट नाइटलाइफ'ची एवढी क्रेझ का आहे याचं उत्तर लगेच मिळतं. सीपीयू फॅनची सीलिंग फॅनशी एकीकडे स्पर्धा सुरू असते. आकाशातले तारे आपली जागा बदलत असतात पण हा निशाचर मात्र अढळ ध्रुवासारखा एकाजागी ठाण मांडून बसलेला असतो, तो पहाटेच्या कावळ्यांची लगबग ऐकू येईपर्यंत! तांबडं फुटायची चाहूल लागली रे लागली की या तमाम विण्डोजची शटर्स खाली येतात, की-बोर्डवरची बोटं थांबतात, सीपीयू फॅन बंद होतो आणि सीलिंग फॅनच्या सोबत, सूर्याच्या साक्षीने हा निशाचर निदेला जवळ करतो.

Wednesday, January 4, 2012

न जाने क्यों?

लाखों-करोडोंकी भीड में, अकेलापन क्यों?
खिलखिलाहटोंकी गूंजमें सुनापन क्यों?
जोशभरे माहौल में ऐसी उदासी क्यों?
खिलते चेहरेपर आसू की झलक क्यों?

रोशन हुए रास्तोंपे डगमगाते पैर क्यों?
अंधेरे मकानोंमें ढूंढती नजर क्यों?
सच्चाई के राह पर यूं झिझकना क्यों?
किए हुए वादोंसे यूं मुकरना क्यों?

मासूम चेहरे के पिछे बदमाशी क्यों?
शैतान के दिल में भी प्यार क्यों?
भरी मेहफिलमें सूरों का खो जाना क्यों?
अनजान राहीसेभी सूर मिल जाते क्यों?

अपनीही परछाईसे डर लगे, ऐसा क्यों?
सीधी बातोंसे टेढे मतलब निकले, ऐसा क्यों?
सबकुछ होते हुए भी कुछभी न होना, ऐसा क्यों?
कुछ ना होकर भी बहोत कुछ पाना, ऐसा क्यों?

अपनोंसे अपनापन पाने के लिए लडाई क्यों?
खुदही की परछाईसे जुदाई क्यों?
आसान सवालों के मुश्किल जवाब क्यों?
दिनदहाडे खौफनाक ख्वाब क्यों?

रिश्तोंको निभानेके लिए भावनाओंकी रिश्वत क्यों?
जवाबोंके लिए धरती-आकाश एक करनेवाले दिमाग में आखिरकार इतने सवाल क्यों?