Friday, August 7, 2009

प्रोजेक्टची भागदौड

- पुष्कर सामंत
कॉलेज लाइफमध्ये असाइनमेण्ट्स, जर्नल्स सबमिशन या शत्रूंचा साहेब कुणी असेल तर तो म्हणजे प्रोजेक्ट. आतापर्यंत शिकलेल्या, मिळवलेल्या ज्ञानाचा वापर करून प्रोजेक्ट बनवायचा आणि तो 'द ग्रेट युनिव्हसिर्टी'ला सुपूर्द करायचा. पहिल्या वर्षाला आल्यापासून या प्रोजेक्टची मनात धास्ती असते. प्रोजेक्ट म्हणजे शुद्ध कटकट. पायावर कुऱ्हाड मारून घेणं, नाही तर कुऱ्हाडीवर खुद्द बसणंच! सीनिअर्सची धावपळ बघून प्रोजेक्टची भीतीच वाटायला लागते. प्रोजेक्ट पार्टनर्स निवडण्यापासूनच खरी लढाईला सुरुवात होते. अभ्यासू महाभाग तर आधीपासूनच हालचाल सुरू करतात. वर्गातली सीनिअर मुलं आपली प्रोजेक्ट पार्टनर व्हावीत यासाठी नाना युक्त्या लढवतात. सर्वसामान्यपणे मुलं मुलींना मस्का मारतात. कारण मुली अगदी सिन्सिअलीर्, मनावर घेऊनच करणार ना काम? आपण थोडीफार लुडबूड केल्यासारखं करायचं की झालं. बरं पार्टनर्स निवडल्यावर मग कंपनी शोधा. डमी प्रोजेक्टपेक्षा लाइव्ह प्रोजेक्टला जास्त मार्क्स असतात. त्यामुळे कंपनी शोधणं भागच. मग सुरू होतं ते इथे जा, तिथे जा, याला भेटा, त्याला भेटा, मस्का मारा! कधीही न केलेल्या गोष्टी कराव्या लागतात यार... प्रोजेक्टचा नारळ फुटला की, जरा बरं वाटतं. पण खरी गोम पुढे आहे याची जाणीव नसते ना. एक प्रोजेक्ट मिळाला की कॉलेजकडून यासाठी होकार मिळवायचा. तो मिळाला की मग 'मीटिंग्ज'चं सत्र चालू होतं. (आपण फक्त उपस्थितीसाठी जायचं. पार्टनर्स आहेत ना). तीन-चार (व्यर्थ) चर्चासत्रांनंतर काम चालू होतं. सर्वात बोअरिंग पार्ट म्हणजे सचिर्ंग आणि नेट सफिर्ंग. आणखी एक डोकं खाणारा भाग म्हणजे कोडिंग आणि डॉक्युमेण्टेशन. देवा....! २०० मार्कांसाठी २००० कटकटी. एक कोडिंग करायला पाचशे कोडी सोडवा. ते झालं की, ते बरोबर चालतंय की नाही ते बघा. मग त्यातले प्रश्न सोडवा. मेंदूचा खिमा होतो अगदी. दिवसभर कम्प्युटरसमोर डोळेफोड करून नंतर सगळंच 'पिक्सलेटेड' वाटू लागतं. डोळ्यासमोर फक्त कोड दिसायला लागतो. मेंदूवर जणू काही कोडच आलेत. एवढ्या सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये मातृभाषाच विसरायला कसं होत नाही देव जाणे! डॉक्युमेण्टेशन म्हणजे अत्याचारच... टाइप करून करून बोटांची अशी काय अवस्था होते की विचारू नका. झोपेतही ती तशीच हलत असल्याचा भास होतो! जेवताना, घास खाताना ती तशी होत नाहीत हेच मोठंय! बरं, डॉक्युमेण्टेशन झालं की, फॉरमॅटिंग! देवा कधी संपणार असं हे??? नको ती डिग्री! प्रोजेक्ट प्रिण्टिंगला जाईपर्यंत काही ना काहीतरी चालूच असतं. शेवटी वाइण्डिंग करून झाल्यावर जीव जरा भांड्यात पडतो. पण मग बनवलेल्या प्रोजेक्टवर प्रश्न नको का विचारायला? त्यासाठीच तर करतो आम्ही प्रोजेक्ट! त्या 'वायवा'ची तयारी! आपण तर काही केलेलंच नसतं. त्यामुळे पार्टनर्स आपल्याला समजावून सांगत असतात. त्यांचं निमूटपणे ऐकून घ्यायचं! ते म्हणतील ती पूर्व दिशा! खूप मोठ्या मुश्किलीने तो प्रोजेक्ट कळतो... प्रोजेक्ट सीरिअसली घेणारे पण खूप आहेत. प्रोजेक्टला चॅलेंज मानून तो पूर्ण करणारेही कमी नाहीत... हुशार मुलं त्या प्रोजेक्टसाठी वाटेल ते करतात. प्रोजेक्ट म्हणजे त्यांचा जणू छंदच असतो. आम्हाला वाटणारी डोकेफोड आणि कटकट ही त्यांची आवड असते. ते त्या प्रोजेक्टमध्ये पूर्ण घुसलेले असतात. कशाचीच तमा बाळगत नाहीत. प्रोजेक्टला त्यांनी असं वाहून घेतलेलं असतं की सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस त्यांच्या तोंडपाठ असतात आणि मुख्य म्हणजे ते मातृभाषा पण विसरलेले नसतात. अजब रसायन असतात ही मुलं! आम्ही त्यांचे चरणकमल स्पर्शतो! त्यांच्या बुद्धीतला एक सहसांश जरी आम्हाला मिळाला तरी आमचा उद्धार होईल... २०० मार्कांसाठी एवढी खटपट करण्यापेक्षा १०० मार्कांचे दोन पेपर लिहू. प्रोजेक्ट करताना पार्टनर्सची तोंडं वेगवेगळ्या दिशेला. त्यामुळे खटके उडणं हे आलंच. या खटक्यांचं कधी कधी भांडणात रूपांतर होतं आणि प्रकरण एवढं पुढं जातं की, ते एकमेकांचं तोंडपण पाहू इच्छित नाही... २०० मार्कांसाठी मैत्री तुटते??? देवा... वाचीव रे बाबा! प्रोजेक्ट हा शब्द ऐकला तरी एका क्षणासाठी चिडचीड होते. शेवटी काय प्रश्न २०० मार्कांचा आहे, २००!!! खरी परीक्षा सुरू होण्याआधीच प्रोजेक्ट सबमिशन हीच आम्हाला परीक्षा वाटते... मार्कांथीर्ंना काय सगळ्याचीच कटकट! चला 'वायवा'ची तयारी करायचीय. प्रोजेक्ट पार्टनरला विचारायला हवं. कुठपर्यंत आलाय प्रोजेक्ट ते!

No comments:

Post a Comment