Saturday, September 30, 2017

छिन्नविच्छिन्न आकडे

मर्ढेकरांच्या सोज्वळ बंदराचं रुपडंच बदलून गेलं
यशाचे जिने चढताना लाथांमध्ये हे शहरच मरून गेलं

स्वप्नांना मूर्त रूप देणारी झगमगती माया नगरी
प्रेतांच्या सड्यामधून रक्ताने माखून गेली पुरी

गर्दीतच नांदणारा जीव गर्दीनेच घेतला
वेळेशी बांधलेल्या पाखराला काळाने अवेळीच गाठला

नशीबाचे काटे कसे भर्रकन फिरले
तोरणाच्या जागी देहावरती हार विखुरले

यंत्रणेचे दोष, कुणी नेत्यांकडे वटारी डोळे
सारेच मिळूनी साजरे करूया मरणाचे सोहळे

अदृश्य ऊर्जेचा भारी उदोउदो झाला
लाचारीने जीव मात्र पार कवडीमोल झाला

सुन्न कोलाहलामध्ये गुदमरले भोळे भाबडे 
अन् कपाळावरती उरले फक्त निर्जीव आकडे

Friday, September 29, 2017

दहन

मुडदों के इस जंगल में आ चल थोडी सैर करे
इन नकली खाली चेहरों से आ चल थोडा बैर करे

झूठ की गहरी लहरों को आ चल साथ में तैर करे
मक्कारों के बाज़ारों में लंबे अपने पैर करे

नफरत के इन बागों में चल भवरें बन कर उड चले
चींखती अंधेर गलियों में लुटेरे बन कर मुड़ चले

क्यों तुझको इन्सान कहे
जब चाल तेरी हैवान रहे
रग रग में काला ज्ञान बहे
अज्ञान से मन सुनसान रहे

चाह में तेरे रावण है
आह में क्रोध भीषण है
वो पापी फिर भी शिवभक्त था
विद्वत् फिर भी मदमस्त था

संसार का तू एक शून्य है
किसी पापी का तू पुण्य है
तेरी सोच का दिनकर ढल जायेगा
तेरा अस्तित्व भी जल जायेगा

Saturday, September 16, 2017

डार्विन आणि वानरवेडी कृष्णविवरे

मुळातच बौद्ध्यांक कमी असणा-या माणसांना बचावासाठी विविध बिरूदं, फलक लावलेल्या पर्यायी ढालींची निर्मिती करावी लागते. या ढालींचा वापर कधी बचावासाठी तर कधी हल्ल्यासाठी सोयीस्कररित्या केला जातो. मग ह्या ढाली पुढे करत समोरच्याला नामोहरम करण्याचा क्षणिक आनंद ही माणसं मिळवत असतात. वानरं ज्या प्रमाणे वेडे चाळे करत, झाडा-फांद्यांच्या ढाली पुढे करत काही क्षणांपुरतं विचकट हास्य करत इथून तिथे उड्या मारतात तसाच काहीसा हा प्रकार असतो. ह्या माणसांचे चाळेही आपण पूर्वी वानर होतो हे दाखवून देणारे असतात. किंबहुना हे बिचारे वानराचे नर झालेच नाहीत आणि उत्क्रांती होत असतानाही चाळ्यांमध्येच मग्न राहिले याची प्रचिती देत राहतात. डार्विनचा नियम ह्यांना लागू होत नाही. Survival of the fittest ऐवजी Survival of the shittest हा खरा नियम होता का असं वाटू लागतं.
ह्या ढालींच्या आड मग ही माणसं रमायला लागतात. एकसारख्या ढाली असणा-या वानरवेड्या माणसांचे समूह तयार होतात. ह्या समूहामध्येही मग आपलीच ढाल कशी काय श्रेष्ठ याच्या बाता, बढाया मारल्या जातात. लकाकणारी ढाल मिरवत तिच्या पलिकडचा जीव मग स्वयंघोषित तारा बनू लागतो. स्वतःच्याच (खरंतर त्या ढालीच्या) काळ्या प्रकाशात न्हाऊ-गाऊ लागतो. ढालीमागे दडलेले असल्यामुळे मग हळूहळू हे वानरवेडे स्वयंघोषित तारे इतरांपासून वेगळे होत जातात. अंगाभोवती सतत ढाल असल्यामुळे स्वच्छ सूर्यप्रकाशही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मुळातच ढालीचा असा एक प्रकाश असल्यामुळे त्यासमोर सूर्यप्रकाशही काजव्यासमान भासू लागतो. ढालीमागचा हा वानरवेडा मग त्या तेजामध्ये आत्ममग्न होत जातो. स्वतःच्या तेजोमय चाळ्यांचं स्वतःच कौतुक करू लागतो. त्यावर टाळ्यादेखील स्वतःच वाजवतो. (एका हातात ढाल असल्यामुळे टाळीचा आवाज वेगळ्याच सुरात येतो हा मुद्दा अलहिदा) हा वानरवेडा स्वतःमध्ये इतका गुंतत जातो की तो तेजस्वी गुंता म्हणजे त्याच्यासाठी एक आभाच बनून जातो. स्वतःमध्ये गुरफटत गुरफटत मग तो आकुंचन पावतो. आधीच कमी असलेला मेंदूचा आकार अधिकाधिक सूक्ष्म होत जातो. ज्याप्रमाणे ता-याच्या गर्भातला हायड्रोजन जळून मग हेलियमही जळतो आणि कालांतराने त्याचा मोठा स्फोट होऊन तो स्वतःच्याच केंद्राकडे खेचला जातो तसंच काहीसं ह्या वानरवेड्याचं होतं. स्वतःच्याच गुरूत्वाकर्षणाने तो इतका सूक्ष्म होतो की तो जवळजवळ अदृश्यच होतो. हे असं बिंदूरूप होणं म्हणजेच कृष्णविवर बनणं. भौतिकशास्त्राचे कुठलेही नियम मग ह्या कृष्णविवराला लागू होत नाहीत. प्रकाशालाही ते स्वतःमध्ये गिळंकृत करतं. 
हे असं वानरवेडं कृष्णविवर मग ढालीच्या सहाय्याने ब्रह्मांडात मुक्तसंचार करू लागतं. कालांतराने ह्या ढालीची त्याला इतकी सवय होते की त्या ढालीशिवाय ते जगूच शकत नाहीत. ती ढालच त्याचं सर्वस्व बनून जाते. ती ढालच त्याची ओळख बनते आणि त्या ढालीमुळेच त्याचं फुटकळ अदृश्य अस्तित्व टिकून असतं. कुणीतरी ती ढाल आपल्याकडून हिरावून घेईल अशी भीती मग हळूहळू त्या कृष्णविवराला ग्रासायला लागते. आणि मग ढालीचा बचाव ते करू लागतं. ज्या उद्देशाने ढाल हातात घेतली त्या उद्देशाला हरताळ फासला जातो. पण मुळातच बौद्ध्यांक कमी असल्यामुळे त्या उद्देशाचंही काही सोयरसुतक राहत नाही.
असं हे वानरवेडं, बौद्ध्यांक कमी असलेलं कृष्णविवर ढाल नाचवत ब्रह्मांड नासवत राहतं. इतर तेजस्वी तारे, ग्रह मग त्या कृष्णविवरामुळे स्वतःचा भ्रमणमार्ग बदलतात. पण दैवदुर्विलासामुळे कधीतरी या कृष्णविवराशी टक्कर होते आणि मग गडद भयाण अंधारी शांतता नशीबी येते.
टीप - कृष्णविवरे वेळीच ओळखा.

Tuesday, July 25, 2017

अधुरे ख़्वाब

कुछ अधुरे ख़्वाब ऐसे
कुछ अधुरे जवाब जैसे
कभी रातें रूठ जाये
कभी बातें लूट जाये
कई ख्वाहिशें है
कई रंजिशे हैं
कुछ साजिशे हैं
सुखी बारिशों में
भीगी बंदिशे हैं

कुछ अधुरी लिखी खतियाँ
कहीं अधुरी बुझी बत्तियाँ
ये लफ्ज़ बोल ना पाये
रोशनी में चल ना पाये
सूखे है यह नैना
अंग ना है चैना
खनके ना कंगना
खामोशियों मे
बीत जाये रैना

हम कहीं खो गये हैं
खुद ही खुद में सो गये हैं
नाकाम है सभी दुआएं
बेअसर है सब दवाएं
सपनों से दूर
थोडा बेकसूर
भटका ज़रूर
तबदील हुआ है
मेरा सुरूर

Thursday, June 1, 2017

गुमसुम


ख्वाबों की तलाश में हम घोसलें छोड आये
मंजिल पाने निकले, अपनी गलियां मोड आये

शतरंज की चाले चलने आँगन की मिट्टी छोड आये
आसमान में उड चले, अम्मा का आँचल छोड आये

ऊँचाईयों की ओर चले अपनों का हाथ छोड आये
तरक्की के चक्कर में यारों का साथ छोड आये

बेरहम दुनिया के वास्ते खुद को भूल आये
आँसूओं को छुपाने, हसीं के नकाब ओढ आये

चमकने की उम्मीद लेकर निकले थे
अकेला सितारा बनकर रह गये
लहरों पर सवार होने चले थे
तनहा नैया बन के डूब गये
बारिश की बूंदों में भिगे सारा जहाँ
बरखा में भी सूखे रह गये
सपनों को पूरा करते करते
घर से दूर आ गये

Thursday, March 30, 2017

खिलता जा

फुलों सा खिलता जा, खिलता जा
भवरों सा गुनगुना, गुनगुना

बगियन में सजे रंगों की होली
रंगों में भिगती कलियों की टोली
तितलियों से आखमिचोली
रंगों में घुलता जा मिलता जा

नदियों में बहता नीला पानी
बूंदों में लिपटी शामें सुहानी
लहरें जैसे बहती चाशनी
झरनों सा बहता जा मुडता जा

महफिल में बजे बन्सी सुरीली
शहनाई लाये सुरों की डोली
बंदिश छेडे मन की बोली
गीतों सा बंधता जा बनता जा

रतियां जगाये नैन कोई
प्रीत की रीत है जागे न सोयी
चांदनी संग है मीत रचाई
तारों सा गिरता जा फिरता जा

Tuesday, February 7, 2017

छानी में

सर्द मौसम की चपेट में
गर्द कोहरे की लपेट में
थरथरातें हाथों से
छानी में खोले मिठाई के खाली बक्से
कुछ ज़र्रे गत्तों के किनारों में फसे
उस पुरानी महक में खामोश सोये

ठंडी लहरों के लम्स से ठिठुरते ज़र्रे
उन से झाँकती-मुस्कुराती यादें
यादों में पले गर्म लम्हों की चिंगारियाँ
उन में सुलगते अधुरे कुछ वादे

ज़र्रों के इर्द-गिर्द मंडराती मुस्कराहटें
छानी में बिखरी कुछ गर्म हसरतें
कोहरे में छिपी हैरान करवटें
इतराती, शरमाती काली हसीन रातें
पायल की झंकार, झुमके की झनझन
चमचमाते मोती और खनकते कंगन
मिसरी सी बातें, खट्टी शरारतें
तिखी नज़रों में प्यार की बरसातें
मिट्टी का स्वाद, तितली की मुराद
गुल्लक में समाये नन्हे ख्वाब ज़िन्दाबाद
यारों की मस्ती, वादों से दोस्ती
कलियों संग झूमती मदहोश वो कश्ती

महफूज है इस बक्से में, 
मन के हर गलियारे में,
छानी की ठंडी फ़र्श पर, 
रूह के हर ज़र्रे में